काजुर्ली येथे टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

आबलोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ या शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वाणी डिंगणकर आणि श्रावणी निवाते यांनी केले. कु. कैलास सुवरे, कु. रुतुजा तावडे, कु. श्रावणी नितीन निवाते, कु. शर्वाणी दिनेश डिंगणकर यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कु.रंजिता भुवड या विद्यार्थ्यांनीने भूषवले.मुख्याध्यापक दशरथ साळवी,उपशिक्षक संदेश सावंत , स्वयंसेवक सौ.आम्रपाली जाधव ,सौ. श्रावणी पागडे या शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली.