प्रेमजीभाई आसर प्राथ.विद्यालयात क्रांती दिन साजरा

चिपळूण -परशुराम एज्युकेशन सोसायटी,संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण या शाळेत क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक मॅडम यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि लोकनेते यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका सौ.ज्योती शिंदे यांनी क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्रांती दिना निमित्ताने इ.४थी तील विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक मॅडम यांनी क्रांती दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधून देशासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या व देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या विविध क्रांतीवीरांविषयी माहिती दिली तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशाप्रकारे देश सेवा करू शकतो हे विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून दिले. सर्वांना देश कार्याची प्रेरणा देणारा असा हा क्रांती दिन शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.