दुसऱ्याच्या नावावर असलेल्या सिम चा वापर हाच एकमेव धागा प्रसाद लोकेच्या खुनात क्लू ठरला!

दुसऱ्याच्या नावावर असलेल्या सिम चा वापर हाच एकमेव धागा प्रसाद लोकेच्या खुनात क्लू ठरला!

खून आणी त्याच्या पत्नीची आत्महत्या यांचे कारण अद्यापही पोलिसानी ठेवले गुलदस्त्यात!

सिंधुनगरी : बाळ खडपकर

 

मिठबाव येथील प्रसाद लोकेच्या खुनाचा कोणताहीठोस पुरावा नसताना सिंधुदुर्ग पोलिसांनी सायबर क्राईम च्या मदतीने या गुन्ह्यात ज्या सिम चा वापर झाला तोच धागा पकडत या खुनाच्या गुन्हातील खऱ्या आरोपीला या गुन्ह्यात वापरलेल्या मुद्देमालासह पकडले व तपास कामात सिंधुदुर्ग पोलिसांनी फार मोठी चतुराई दाखवीली. मात्र प्रसाद चा खून आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या याचे कारण मात्र अद्यापही पोलिसाला माहीत असले तरी ते जाहीर झाले नाही.

पतीचा खून आणि लागलीच पत्नीची आत्महत्या याबाबत कोणते ठोस पुरावे नसतानाही केवळ सायबर क्राईम ब्रँच व सिंधुदुर्ग पोलीस दलाचे कौशल्यामुळे हे गुढ उलगडण्यास सिंधुदुर्ग पोलिसांना यश मिळाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व सायबर क्राईम ब्रँच च्या मदतीने खून व आत्महत्येचे कारण पोलिसांनी शोधले आहे . व या खुनाचा गुन्हा काही तासातच उघडकीस आणला आहे.
देवगड तालुक्यातील मिठबाव येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक प्रसाद लोके यांच्या खुनानंतर अनेक तर्कवितर्क व चर्चा ना वेग आला होता. प्रसादच्या खुना नंतर दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी मनवा उर्फ अंकिता हिने आपल्या माहेरी आईच्या कुशीत झोपली असताना मध्यरात्री उठून गळफासाने आत्महत्या केली होती. त्यामुळे तिच्यावरही संशयाची सुई गेली होती. मात्र पोलिसांनी तिच्या आत्महत्येपूर्वीच या खुनाचे गुड उलगडले होते. व तिच्या आत्महत्या मागचे कारणही पोलीस तपासात स्पष्ट झाले असले तरी पोलिसांनी पूल आणि आत्महत्या मागील कारण अद्याप जाहीर केलेले नाही.
संशयित्व आरोपीने या गुन्ह्यात वापरलेले सिम हा एकमेव धागा पोलीस तपासात कारणीभूत ठरला. हे सिम संशयित आरोपीने दुसऱ्या एकाची फसवणूक करत मिळविले होते. व त्या सिम कार्ड वरून त्याने कॉल करून मध्यरात्री भाडे आहे म्हणून सांगून प्रसादला बाहेर बोलवले होते. पोलिसांनी सिम कार्ड असलेल्या पहिल्या संशयतास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला त्याच दरम्याने पोलिसांच्या सायबर क्राईमने मोबाईल कॉल्स, सी डी आर रिपोर्ट्स, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज याची चौकशी सुरू केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेला त्या सिम चा मालक गुन्हा कबूल करत नाही तसेच तो खुनाचा हा गुन्हा करू शकत नाही याची खात्री जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना झाली. त्याच दरम्यान सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सायबर क्राईम ब्रँच वापरलेल्या तो मोबाईल नंबर व तेथील ज्या मोबाईल मध्ये वापरले गेले त्याचा शोध घेत होते. व हे सिम ज्या मोबाईलवर वापरण्यात आले त्या मोबाईलचा आय एम ई नंबर शोधून काढला गेला. या आय एम ई नंबर वर अन्य सिम वापरले गेले का याची खात्री करण्यात आली. त्यावेळी त्या संशयित आरोपीने या मोबाईलवर आपले सिम काही महिन्यापूर्वी वापरल्याचे उघड झाले व एवढ्याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी खऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दुसऱ्याच्या नावे सिम असल्याने आपण प्रसाद चा खून करून सही सलामत सुटू अशी कल्पना करत आपला मित्र असलेल्या प्रसादचा निर्दयपणे खून त्याने केला होता. ज्याच्याकडून त्याने सिम मिळवले त्या व्यक्तीला आहे याचा अंदाज नव्हता. किंवा आपल्या नावे सिम कार्ड काढले गेले आहे याचीही जाणीव त्याला नव्हती. त्यामुळे या संशयित आरोपीने आपली हुशारी दाखवत हा गुन्हा करण्याचे धाडस केले होते. पोलिसांनी तपासलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये याचे वाहन अथवा हा संशयित कुठेच आढळला नव्हता त्यामुळे पोलिसांसमोर या तपास कामाचे मोठे आव्हान उभे होते.

संचार साथी वर आपल्या मोबाईलची ही खात्री करा.

दुसऱ्याच्या नावावर असलेले सिम काही लोक अनेक गुन्ह्यांमध्ये वापरतात. फसवणूक करणे, गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी अशा सिमच्या वापर केला जातो. असे अनेकदा पोलीस यंत्रणांच्या तपास कामात निदर्शनास आले आहे. दूर संचार विभागाची Sanchar Saathi ही लिंक असून आपल्या नावावर किती मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आहेत हे आपला आधार ला लिंक असलेला एक मोबाईल नंबर टाकून खात्री करून घेता येते. हे खात्रीही नागरिकांनी करून घ्यावी पोलिसांनी केले आहे.

https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/