खासदार राऊत यांना ओबीसींची मते मागण्याचा नैतीक अधिकार नाही

ओबीसी संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र गीते

राजापूर (वार्ताहर): आजवर ओबीसींच्या मतांवर निवडुन येणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी ओबींच्या प्रश्नांवर कधीही अवाक्षर काढले नाही. मात्र आता अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबींसीसाठी घेतलेल्या भुमिकेवर महसुलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलेल्या वक्त्व्याचे समर्थन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना येत्या निवडणुकीत ओबीसी समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा परखड ईशारा ओबीसी संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र गीते यानी दिला आहे.

खासदार विनायक राऊत हे गेली दहा वर्षे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी करत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वाधिक असलेल्या ओबीसींच्या मतांवर ते निवडणुका जिंकत आले आहेत. मात्त त्यांनी यापुर्वी कधीही ओबींच्या प्रश्नांवर शासनाकडे आपले तोंड उघडलेले नाही. असे असताना ते आता मराठा समाजाची कड घेवून पोपटपंची करत आहेत. हे आम्ही कदापीही खपवून घेणार नाहीत असा सज्जड ईशारा श्री.गीते यांनी दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देता येणार नाही. त्यांना स्वतंत्रपणे शासनाने आरक्षण देण्यास ओबीसी समाजाची कोणतीही हरकत नाही. अशी भूमिका घेत ओबीसीनेते छगन भुजबळ यांनी राज्यात ओबीसी बांधवांची बाजु घेत यल्गार पुकारलेला आहे. त्यामुळे पोटशुळ उठलेले काही मराठा समाज आरक्षण धार्जिणे नेते आणि मंत्री ओबीसी नेते आणि राज्याचे अनन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राज्याचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखेपाटील यांनीही छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा तऱ्हेची दुटप्पी भुमिका मांडली होती. त्यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांचे कौतुक करताना भुजबळ यांना शासनाचा पाठींबा असून ते दोन समाजात भांडणे लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत समस्त ओबीसी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. खासदार राऊत हे ओबींच्या मतांवर निवडून आलेले आहेत. ओबीसी समाज अनेक वर्षे आपल्या हक्कांसाठी लढत आलेला आहे. मात्र अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून ओबींच्या प्रश्नांबाबत खासदार राऊत यांनी कधीही चकार शब्द काढलेला नाही. ओबींच्या भवितव्याबाबत त्यांना देण घेण नाही अशा राऊतांना ओबीसींच्या मतांवर निवडणुन येण्याचा नैतीक अधिकार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा ईशारा गीते यांनी दिला आहे.