कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत आणि भाजपा नाटळ – सांगवे व हरकुळ बु. यांच्यावतीने रविवार १७ डिसेंबर रोजी कनेडी, सांगवे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोतिबिंदू तपासणी, हर्णीया तपासणी, अपेंडिक्स व महिलांसाठी गर्भपिशवी तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर गरज असलेल्या रुग्णांपैकी पहिल्या १० गरीब व वृध्द नेत्ररुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधवारी येथील विवेकानंद रुग्णालय कणकवली येथे करण्यात आली. इतर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची टप्या टप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियांचा व औषधोपचारांचा पूर्ण खर्च युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष तसेच सांगवे सरपंच बाबू सावंत, उपसरपंच प्रफ्फुल काणेकर व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावतीने दरवर्षी असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते त्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येते. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांचे आभार मानले आहेत.












