दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
लांजा | प्रतिनिधी : मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ साजरा महिलाश्रम लांजा येथे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि अभिवादन करण्यात आले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्या वतीने हा दिन शनिवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी लांजा येथील महिलाश्रम या सेवाभावी संस्थेत जाऊन येथील मुलांना शैक्षणिक साहित्यम तसेच खाऊ वाटप करण्यात आले. आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्यात आला. या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन केले. यावेळी पत्रकार परिषद लांजा शाखाध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या आजवरच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, उपाध्यक्ष रवींद्र साळवी, जिल्हा प्रतिनिधी जगदीश कदम तसेच तालुका पदाधिकारी संतोष कोत्रे, ,नासिर मुजावर आदी उपस्थित होते. तसेच महिलाश्रमच्या महिला निरिक्षण गृहाच्या अधिक्षिका ज्योती यादव, बालगृह अधिक्षिका सायली वाघदरे, शिक्षिका अनुजा कांबळे, क्लार्क शांताराम शिवगण आदी उपस्थित होते.










