सावंतवाडी । प्रतिनिधी : सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष, तथा पत्रकार सीताराम गावडे यांची यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. सावंतवाडी तालुका सकल मराठा संघाच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते श्री साईबाबांची प्रतिमा भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आली. याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर,विजय देसाई, सचिव मयूर चराठकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर,प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव,सचिन रेडकर , रुपेश हिराप, , भुवन नाईक, आनंद धोंड , शैलेश मयेकर, निखिल माळकर, उमेश सावंत , राजू तावडे आदि उपस्थित होते. यावेळी आपण तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी अविरत लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सांगितले.












