खेड (प्रतिनिधी)
खेड बसस्थानकातून खेड- कल्याण बसफेरी ९ फेब्रुवारीपासून धावू लागली आहे. खेड स्थानकातून सकाळी ११ वाजता सुटते. तर कल्याण स्थानकातून रात्री ८.३० वाजता सुटेल. बसफेरीला भरणे, कशेडी, पोलादपूर, महाड, माणगाव, रामवाडी, पनवेल, डोंबिवली आदी स्थानकात थांबे आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण एसटीप्रेमी ग्रुपचे जनसंपर्कप्रमुख साहिल हुंबरे यांनी केले आहे.












