मारुतीच्या शेपटी प्रमाणे जरांगे पाटील सरकारची अडवणूक करत आहे!

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सिंधूनगरी | प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर जरांगे पाटलांनी उपस्थित केलेले वेगवेगळे प्रश्न म्हणजे मारुतीच्या शेपटी प्रमाणे आणि सरकारची अडवणूक करण्याचे काम सुरू असल्याचा टोला अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत लगावला .

सिंधुदुर्ग नगरी येथील विश्रामगृहावर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक कार्याध्यक्ष काका कुडाळकर व इतर उपस्थित होते .
यावेळी भुजबळ म्हणालेआरक्षण म्हणजे गरीबी हटाव प्रश्न नसून सामाजिक दृष्टीने इतर समाजाच्या बरोबर समान वागणूक मिळावी या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या आरक्षण असते मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु ओबीसी मधून आरक्षण द्या हा जरांगे पाटील यांचा हट्ट म्हणजे मारुतीच्या शेपटी सारख्या वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित करण्यासारखे प्रकार सुरू आहेत. यातून सरकारची अडवणूक करण्याचे प्रकार तरंगे पाटलांकडून सुरू आहे. ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असे आयोगाने आणि न्यायालयाने ही जाहीर केले आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार नाही हे यातून स्पष्ट होतेराज्यात ओबीसीच्या ३७४ जाती असूनमराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगली भूमिका घेतली होती परंतु जरांगे पाटलांचे मागणीनुसार शासनाने घेतलेले निर्णय योग्य आहेत.
शिवसेनेत असताना पक्षनिष्ठा ठेवून वाढविलेला १९८५ साली निवडणूक झाली त्या निवडणुकीत शिवसेना वेगवेगळ्या चिन्हावर लढली आपण मशाल निशाणीवर निवडून आलो तुम्ही तुतारी फुंका मशाल घ्या त्यातून कुणाला पेटू नका असे भुजबळ म्हणाले.
काँग्रेस दुभंगली त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्येही शरद पवार यांच्या बरोबरीने निष्ठेने पक्ष वाढविला .भाजपा सोबत राष्ट्रवादीकाँग्रेस पाठिंबा देणार अशी २०१४ पासून चर्चा होती उद्धव ठाकरे यांच्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा सोबत जावे लागले. शिवसेना भाजप एकत्र जरी लढले तरी त्यांच्या सोबत ते बसू शकले नाहीत. भाजपाला सल्ला देण्याइतपत भुजबळ मोठे नाही त्यामुळे विनायक राऊत यांनी ३२ वर्षांपूर्वीचे भुजबळ आठवावे आपले कर्तृत्व लहान आहे मंडळ आयोगाच्या प्रश्नावर सरकार विरोधात आपण उभे राहिलो पक्षातून बाहेर पडलो आज भाजप पक्ष जगात आणि भारतात मोठा पक्ष आहे तुम्ही शिवसेना भाजपा काँग्रेस एकत्र बसतात मग तो तिढा का सोडू शकत नाहीअसा सवालही विनायक राऊत यांच्या बाबतच्या प्रश्नावर भुजबळ यांनी सांगितले व तुमच्या घरात सल्ले द्या दुसऱ्याच्या घरात डोकावून बघू नका असेही भुजबळ यांनी शेवटी बोलताना सांगितले. कोकणात राष्ट्रवादी पक्ष वाढत नाही पश्चिम महाराष्ट्र विदर्भात राष्ट्रवादी पक्ष झपाट्याने वाढला या प्रश्नावर भुजबळ यांनी आपण उपस्थित केलेल्या पक्ष वाढीच्या प्रश्नाबाबत आम्ही लक्ष घालूअसेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.