माखजन|वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकातून मुंबई सेंट्रल ला जाण्यासाठी एकही बस नाही.व एकाही मुंबई गाडीचे आरक्षण ही मिळत नाही अशी स्थिती असताना बसस्थानकात फलाट क्रमांक १ वर मुंबई गाडी चा उल्लेख करण्यात आला आहे.माखजन बसस्थानक देवरुख अंतर्गत चालते.देवरुख आगाराच्या ह्या अजब कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या प्रवासी हंगाम सुरु असताना करजुवे मुंबई सारखी कित्येक वर्षे जुनी बसफेरी देखील देवरुख आगाराने सुरु केलेली नाही.माखजन बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास् होत आहे.फलाट क्रमांक १ वर केलेला उल्लेख तात्काळ हटवावा किंवा मुंबई बसफेरी सुरु करावी अशी मागणी होत आहे.









