मणचेकर रापण संघाच्या मागणीनुसार भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे मदतकार्य 

 

 

मालवण | प्रतिनिधी : चिवला बीच येथे मणचेकर रापण संघाच्या शेडच्या बाजूला मोठया प्रमाणात जमा झालेला दगड माती आणि कचरा भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी जेसबी यंत्रणेच्या साहाय्याने दूर करत परिसर मोकळा केला.

 

मालवण चिवला बीच येथे मणचेकर रापण संघ यांच्या शेड च्या बाजूला मोठया प्रमाणात दगड माती आणि कचरा जमा झाला होता. याबाबत मणचेकर यांनी भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना माहिती देताच त्यांनी जेसीबी यंत्रणा पाठवून दगड, माती व कचरा बाजूला करत परिसर स्वच्छ करून दिला. याबाबत रामा मणचेकर रापण संघाच्या वतीने आभार माणण्यात आले.

 

जनसेवेसाठी तत्पर रहा. या खा. नारायण राणे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सेवाकार्य करण्यासाठी नेहमीच प्रयत्नाशील राहणार असल्याचे दीपक पाटकर यांनी या निमित्ताने सांगितले.

 

यावेळी भाजपा पदाधिकारी महेश सारंग, ललित चव्हाण, वसंत गांवकर, बाबू धुरी यांसह मणचेकर, बाबी आडिवरेकर, आबा शिर्सेकर, विशाल गोवेकर यांसह अन्य उपस्थित होते.