वेंगुर्ले : दाजी नाईक
माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी बांदा येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार नारायण राणे यांचे सायंकाळी सिंधुदुर्ग येथे आगमन झाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे बांदा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी खास. नारायण राणे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दादा साईल, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, सायमन अलमेडा व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.












