दापोली हर्णै मार्गावरची घटना
रत्नागिरी | प्रतिनिधी :चालत्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली. दापोली हर्णै मार्गावर घटना ही घडली आहे. चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप असले तरीही मेंटेनन्स योग्य पद्धतीने केला नसल्याने दापोली एसटी डेपो चा अजब कारभार समोर आला आहे.
रविवारी दुपारी दीड वाजता सुटलेल्या पाजपंढरी दापोली एसटी बसमधे अचानक इंजिन गरम झाल्याने चालत्या गाडीमधून धूर येऊ लागला आहे. सुदैवाने चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना उतरून ठेवून ही गाडी उभी करण्यात आली आहे.
हा प्रकार दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे घडला आहे. यावेळी एसटी बस मध्ये दहा ते बारा प्रवासी होते त्यांना सुखरूप उतरवण्यात आलं आहे.












