पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप

 

राजापूर (प्रतिनिधी): भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी राजापुरात भाजपाच्या वतीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान, एक कणखर नेतृत्व, देशाचा आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करून निर्णय घेणारे, जगभरात ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतले जाते, जगाच्या नकाशावर भारताचे स्थान उंचावणारे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मंगळवारी देशात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजापूरातही भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला व पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंगळवारी सकाळी राजापूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला आघाडीच्या सौ. सुयोगा जठार, दीपक बेंद्रे, विनायक कदम, वेळी राजापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर शर्मा आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते