तर भारतामध्ये जगाचे नेत्तृत्व करण्याची ताकद – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी : भारत देशाला महाशक्ती बनायचे आहे. हे स्वप्न तत्कालीन माजी राष्ट्रपती स्वर्गिय ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी पाहिले. त्याच बरोबर अनेक थोर नेत्यांनीही हे स्वप्न पाहिले आहे. भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न युवापिढीच पूर्ण करु शकते असे स्वातंत्र्यपुर्वीच स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. युवाशक्तीमध्ये एवढी ताकद आहे. येणाऱ्या काळामध्ये स्किल, स्केल आणि स्पीड या तीन गतीमान त्रिसुत्रीला धरुन युवक चालला तर भारताची जगाचे नेत्तृत्व करण्याची ताकद आहे, असा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस यांनी ईच्छापूर्ती मंगल कार्यालय हॉल, ओरोस फाटा येथे आयोजीत केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए.एस. मोहारे, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्र. सहाय्यक आयुक्त ग.प्र. बिटोडे, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, प्रत्येक युवकाच्या हाताला काम व त्यांच्या प्रगतीला गती देण्याचे काम देश व राज्य पातळीवरुन शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. स्किल, स्केल आणि स्पीड या तीन त्रिसुत्रींच्या माध्यमातून प्रत्येक युवकाच्या हाताला स्किल असेल अशा मानसिकतेमधून प्रत्येक युवकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत आहेत. प्रत्येक युवकाला आणि देशाला गतीमानतेच्या दिशेने नेहण्याचे काम केले आत आहे. जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. जग आता इंटनेटमुळे हातात आले आहे. जगामध्ये कोणत्या कौशल्याची गरज आहे, याची माहिती एका क्लिक मध्ये आता घरबसल्या कळते. या झालेल्या बदलाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
जगामध्ये टिकायचे असेल तर योग्य प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरे आयोजीत करण्याचे ठरविले याचे कारण प्राथमिक शिक्षणाचा टप्पा ओलांडून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी युवा पिढी जे पहिल पाऊल टाकणार आहे.
त्याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, हा प्रमुख उद्देश असल्याचे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी ते सांगून पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्चस्थान मिळवायचे असेल आणि मेरीट मिळवायचे असेल तर शासन आणि शासनाच्या माध्यमातून काय मदत मिळाली पाहिजे यासाठी या शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने अनेक शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बळ देण्याचे काम केले आहे. अनेक योजना एक खिडकीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ केल्या आहेत. देशातील गरीब मध्यमवर्गीय माणूसाला जनधन योजनेच्या माध्यमातून बँकांच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. बँकाच्या अनेक योजना आता सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा सर्व समाज घटकांना केंद्र व राज्य शासनाने शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
युवकांना आणि विद्यार्थ्यांना शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या संधी लाभचा घेवून सक्षम होण्याची गरज आहे. यासाठी अनेक व्यवस्था उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात शिकलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरी भागात जाण्यासाठी शिष्यवृत्ती, राहण्याची सोय उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगून शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या संधीचे सोने करुन घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी करुन, ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्रत्येकाने प्यायला पाहिजे. देशातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम देण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी वेगवेगळी शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्याच्या राजवटीच्या काळात शिष्यवृत्त्या देवून अनेक नेते, अभ्यासक घडविण्याचे काम केले. त्यामुळे राज्य शासनाने त्यांचे नाव देवून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन केले आहे. या शिबीराच्या माध्यमातून युवकांच्या आयुष्यामध्ये संधीचे व्दार उघड्याचे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्र. सहाय्यक आयुक्त ग.प्र. बिटोडे प्रास्ताविकामध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट केली.प्रारंभी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला व सरस्वतीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच पालघर व ओरोस येथे आयोजीत करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले.यावेळी बारावी नंतर करियरच्या संधी या विषयावर श्री. जांभेकर, दैनंदिन तंत्रज्ञान व ग्रामविकास या विषयावर डॉ. प्रसाद देवधर, तांत्रिक शिक्षण व नोकरीच्या संधी या विषयावर मिलिंद रामचंद्र देसाई, डिप्लोमानंतरचे करियर या विषयावर सुर्यकांत नवले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवरांचे महत्त्व या विषयावर यु.आर. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेती अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. बिबवणे यांनी मानले.