राजापूर | प्रतिनिधी : राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचे गुरूवारी राजापुरात शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने आ. सामंत यांचा सत्कारही करण्यात आला.
गुरूवारी राजापुरात आलेल्या आ. सामंत यांनी शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राजापूर तालुका शिवसेनेच्यच वतीने आ.सामंत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांसह शिवसेना राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी व ठेकेदार यांसह शहरातील अनेक नागरिकांनी आ. सामंत यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.











