माखजन येथे गडनदी तील गाळ उपश्याला प्रारंभ

 

 

माखजन l वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदी पात्रातील गाळ उपश्याला सुरवात झाली आहे.

माखजन बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पुराच्या पाण्याने व्यापारी व रहिवासी त्रस्त होते.गडनदी पात्रातील व बाजूच्या ओढ्यांमधील गाळ काढण्यात यावा अशी गेली अनेक वर्षे व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती.

या मागणीची दखल आमदार शेखर निकम यांनी घेत जिल्हा वार्षिक नियोजन मधून इंधनासाठी १३ लाख रुपये मंजूर करून आणले शिवाय.गडनदीच्या बाजूला बाजाराकडे असलेल्या ओढ्याला संरक्षक भिंतीसाठी पतन योजनेतून १ कोटी रुपये

एवढा निधी मंजूर करून घेतला आहे.यास्तव आमदार शेखर निकम यांचे आभार मानले जात आहे.

सध्या माखजन बाजारपेठेनजीक गडनदी पात्रात गाळ काढण्याच्या कामाला गती आली आहे.याठिकाणी जलसंपदा विभागातील मशिनरी कार्यरत आहे.

गडनदीचा गाळ उसपत असल्याने बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पाण्याचा फटका भविष्यात कमी बसण्याची शक्यता आहे.गाळ उपश्याची कारवाई तात्काळ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.