खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास

 
 
खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील गरम पाण्याच्या कुंडाची अक्षरशःदयनीय अवस्था झाली होती या पार्श्वभूमीवर
महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने या कुंडाला भेट देऊन तेथे पाहणी करून वाढलेले गवत व अन्य स्वच्छता केल्याने या कुंडाने मोकळा श्वास घेतला आहे
 रत्नागिरी जिल्हा समाजसेवक व देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. त्यापैकीच खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे कुंड. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याची कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाही.
तालुक्यात कार्यरत असणारे महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने या कुंडाला भेट देऊन तेथे पाहणी केली असता प्रचंड मोठे गवत, दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेले होते. तळीरामांचा हे ठिकाण बनल्याचे दिसून आले दारूंच्या बाटल्यांचा खर्च पडलेला त्या ठिकाणी होता. महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने सदर कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, प्रणव मापूसकर, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला आहे आणि या गरम पाण्याच्या कुंडाने मोकळा श्वास घेतला आहे. सदर कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.