खेड(प्रतिनिधी) मध्यरेल्वे प्रशासनाने ख्रिसमससह नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर जाहीर केलेल्या सीएसएमटी-करमाळी, एलटीटी- कोच्युवेली साप्ताहिक, पुणे- करमाळी साप्ताहिक स्पेशलचे १४ डिसेंबरपासून आरक्षण खुले झाले आहे. यात तीनही स्पेशलच्या ४८ फेऱ्यांचा समावेश आहे.
०११५१/०११५२ क्रमांकाच्या सीएसएमटी-करमाळी स्पेशल २० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान धावणार
आहे ०१४६३/०१४६४क्रमांकाची क्रमांकाची साप्ताहिक एलटीटी-कोच्युवेली स्पेशल १९, २६ डिसेंबर तसेच २ व ९ जानेवारी रोजी तर परतीच्या प्रवासात २१, २८ डिसेंबर तसेच ४ व ११ जानेवारी रोजी धावेल. ०१४०७/०१४०८ क्रमांकाची पुणे- करमाळी साप्ताहिक स्पेशल २५ डिसेंबर, १ व ८ जानेवारी दरम्यान, परतीच्या प्रवासात त्याच तारखांना धावणार आहे.
‘सीएसएमटी-करमाळी’ स्पेशलला तीन स्थानकांत थांबा दरम्यान, कोकण मार्गावर हिवाळी पर्यटन
हंगामासाठी धावणाऱ्या ०११५१/०११५२ क्रमांकाच्या सीएसएमटी-करमाळी स्पेशलला वीर, वैभववाडी स्थानकांत थांबे वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. यामुळे तीनही यामुळे तीनही तालुक्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.









