खेड (प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटेनजीक शुक्रवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास खासगी आराम बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
विनायक संदीप शिर्के (२४ रा. खोपट-चिपळूण) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. विनायक शिर्के दुचाकीने चिपळूण येथून लोटे येथे येत असताना एमआयडीसीतील एका कंपनीच्या खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिली. या अपघाताचे. वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु गिम्हवणेकर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमीस मदतकार्य केले.











