भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिठाई वाटून आनंद साजरा
सावंतवाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे करण्यात आला. यावेळी भाजपा नेते नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच इन्सुली येथे भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती मानसी धुरी, शक्ती केंद्रप्रमुख प्रवीण देसाई, मधुकर देसाई, नंदू पालव, झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर, महेश धुरी, ज्ञानेश्वर सावंत, विकास केरकर, ज्ञानेश्वर राणे, आनंद राणे, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, औदुंबर पालव, अजय सावंत, नाना पेडणेकर, आत्माराम गावडे, चंद्रकांत परब, उदय धुरी यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








