आरोंदा पंचशील नगर येथे आंबेडकर जयंती निमित्त 24 एप्रिल रोजी भीमगीत गायन स्पर्धा.

ओटवणे (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवा निमित्त प्रज्ञा, चैतन्य व प्रगती महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने समाज मंदिर आरोंदा पंचशील नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या जयंती उत्सवा निमित्त महिला समूहासाठी भीमगीत गायन स्पर्धा 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता ठेवण्यात आलेली आहे .या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5000 सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, द्वितीय 3000 सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, तृतीय 2000,सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ 1000 रु. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत.ज्या महिला समूहाना या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी निशा जाधव 7517070058,सिद्धार्थ जाधव 9637909252 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.