ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा २५ रोजी पुरस्कार वितरण सोहळा 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडीत कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक तर उद्घाटक म्हणून चंदगडचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, तरुण भारत संवादचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपादक शेखर सामंत, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन उदयकुमार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कुणकेरीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन मडवळ कुडाळच्या परफेक्ट अकादमीचे राजाराम परब, साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सलिम तकिलदार, सौ. प्रा. सुमेधा सावळ (बांदा), कुडाळचे प्राथमिक शिक्षक संजय बांबुळकर, सावंतवाडीच्या प्राथमिक शिक्षिका मृगाली महेश पालव या उपक्रमशील व्यक्तींचा ज्ञानदीप विकास मंडळातर्फे सन्मान चिन्ह, गौरव पत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय जिल्हा कार्यवाह गजानन नानचे (फोंडाघाट) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे

सामाजिक भान ठेवून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरानी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी व त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे या प्रामाणिक हेतूने

ज्ञानदीप विकास मंडळाच्यावतीने गेली अठरा वर्षे उपक्रम राबविण्यात येतो.

या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार शामराव मांगले, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गावस प्रतिभा चव्हाण, श्रद्धा सावंत यांनी केले आहे.