जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती बाळा गावडे यांना मातृशोक 

 

प्रतिनिधी | बांदा 

इन्सुली कोंडवाडा येथील सौ. जयश्री दत्ताराम गावडे (वय. ८४)यांचे वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे रुग्णालयात मंगळवारी सकाळी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे तर विद्या विकास मंडळ इन्सुलीचे संचालक तथा माजी सैनिक किरण गावडे यांची ती आई तर सावंतवाडी येथील प्रतिथयश वकील नीता चंद्रकांत गावडे यांच्या त्या सासू होत. इन्सुली कोंडवाडा येथील स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.