पुरे बु. विविध कार्यकारी सोसायटी भ्रष्टाचार प्रकरणी सहकार विभागाला निवेदन

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील श्री. देवी झोलाई केदार विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी पुरे (बुद्रुक) . , या संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर  २००० ते २०२४ पर्यंत शासकीय वैधानिक लेखापरिक्षण करण्याची मागणी मांडवे येथील श्री. सुरेश पांडुरंग तांबे यांनी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग चे सचिव यांना निवेदना द्वारे केली आहे
या निवेदना त त्यांनी म्हटले आहे की
 श्री. देवी झोलाई केदार विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी पुरे (बुद्रुक) ता. खेड, जि. रत्नागिरी या संस्थेचा शेअर होल्डर असून या संस्थेकडे गेली वर्षभर कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्राची पूर्तता करून संबंधित संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी कर्ज मंजूर करून कर्ज न देता  जमिनीवर  रक्कमेचा बोजा चढवून अन्याय केला आहे
तसेच  ते मागासवर्गीय व बौद्ध समाजातील असल्यामुळे संबंधित चेअरमन व सचिव यांनी कर्ज नाकारले आहे  या संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहेत  या संस्थेत मोठ्या प्रमाणात एससी व एनटी समाजातील लोकांच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस पद्धतीने कर्ज दाखवून भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे
दरम्यान २००० ते २०२४ पर्यंत शासकीय वैधानिक लेखापरिक्षण तातडीने व्हावे  शासकीय वैधानिक लेखापरीक्षण न झाल्यास  २६ जानेवारी २०२५ रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. खेड यांच्या कार्यालयात आमरण उपोषण छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे