महत्त्वाकांक्षी जलजीवन योजना यशस्वीपणे राबवण्याची गरज – पद्मश्री दादा इदाते यांचे प्रतिपादन.

 

मंडणगड : प्रतिनिधी :  केंद्र सरकार च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लोकोपयोगी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, त्याचबरोबर जलजीवन मिशन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असून सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी द्वारे पाणी द्यावयाचे असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन आपली योजना हर घर से जल म्हणून घोषित करून योजना यशस्वीपणे राबविण्यात यावी असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केले.

जलजीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता याविषयी दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन श्रीकृष्ण सभागृह भिंगळोली तालुका मंडणगड येथे दि. 17 व 18 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख असलेले कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पद्मश्री श्री. दादा इदाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, मानवाचा विकास जल, जमीन, जंगल यावर आधारित आहे. त्यामुळे केंद्र सरकारची जलाजीवन मिशन ही योजना कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमात गटविकास अधिकारी विशाल जाधव, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता कविता जवादे, ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच उपसरपंच, जलसुरक्षक अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी, ग्रामसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्राध्यापक अनिरुद्ध पळणीकर, प्रवीण प्रशिक्षक श्री मंगेश नेवगे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा श्रीमती कविता जवादे, सायली गैरत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सर्व व्यवस्था गट संसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार मुख्य संसाधन केंद्र जे.पी.एस फाउंडेशन यांनी मानले.