नागपूर-मडगाव स्पेशल धावली सात तास ‘लेट’

 
खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणारी नागपूर-मडगाव स्पेशल गुरुवारी तब्बल ७ तास  ‘लेट धावली  या मूळे प्रवासी खोळंबले. यास्पेशलपाठोपाठ अन्य ७ गाड्याही उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची
रखडपट्टी झाली.
मांडवी उधना-मंगळूरसह थिविम- अहमदाबाद स्पेशल १ तास १५ मिनिटे उशिराने धावली. सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसही १ तास २५ मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे विलंबाने धावली. केरळा संपर्कक्रांती एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, तर निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे उशिरा धावली.