जि. प. शाळा मेर्वी गुरववाडी रत्नागिरीचे मंथन व BDS स्पर्धा परीक्षेत उत्तुंग कामगिरी

गावखडी/वार्ताहर
रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी जि.प.प्राथमिक गुरववाडी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या मंथन स्पर्धा परीक्षा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी शाळा) ने भाग घेतला होता. सदर परीक्षेमध्ये कु. विहान निलेश म्हादये याने केंद्रात पहिला, रत्नागिरी तालुक्यात 28 वा आणि रत्नागिरी जिल्ह्यात 47 वा आणि महाराष्ट्र राज्यात 57 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. तसेच कु. भूमिका प्रविण नागवेकर केंद्रात तृतीय व शाळेचा निकाल 100% लागला आहे. ही बाब शाळेसाठी भूषणावह आहे.

सन 2025-26 वर्षामध्ये B.D.S. स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडीचा निकाल सुद्धा 100% जाहीर झाला आहे. तो पुढील प्रमाणे – 1) भूमिका प्रविण नागवेकर इ. 4थी 2) निनाद मनोज खर्डे इ. 4थी 3) विहान निलेश म्हादये इ.3री 4) गंधार सत्यवान पेटकर इ. 3री 5) कैवल्य ओंकार अभ्यंकर इ. 3री सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 100% जाहीर झाल्याबद्ल सर्व ग्रामस्थांनी/ शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांनी समाधान व्यक्त केले असून विशेष बाब म्हणून शाळेचे संस्थापक श्री. दिलीप विठ्ठल गुरव यांनी शाळेला भेट देवून प्रत्येक मुलांना पुष्प देवून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री. मसरज शेख सर व श्रीम. शनाज भाटकर मॅडम यांचे सुद्धा पुष्प देवून स्वागत करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात शैक्षणिक प्रगती मध्ये चढता आलेख पाहून श्री. दिलीप गुरव यांनी समाधान व्यक्त केले आणि हा शैक्षणिक आलेख असाच चढता राहुदे असे प्रतिपादन केले . तसेच कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे, मदतनीस सौ. स्नेहल कुरतडकर, श्रीम. शारदाताई गुरव यांची उपस्थिती लाभली होती.