माझ्या मंत्री काळातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस देवगडच्या विकासासाठी : ना. नितेश राणे

देवगड l प्रतिनिधी :मिळालेले मंत्रीपद हे देवगडच्या आमदाराला मिळालेले आहे यामुळे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण देवगडचा विकासासाठी देणार असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री ना.नितेश राणे यांनी केले.ना.नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर रविवारी देवगड तालुक्यात आगमन होताच त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.

 

रविवारी सकाळी जिल्ह्यात आगमन होताच खारेपाटण येथे जंगी स्वागत केल्यानंतर ना.नितेश राणे यांनी मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच स्वागत दौèयाची सुरूवात देवगड तालुक्यातून केली यावेळी पडेल कॅन्टिन येथे त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले यानंतर जामसंडे येथील भाजपा कार्यालयात त्यांचे ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.देवगड तालुका भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालयासमोर त्यांचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, बाळा खडपे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर,मुकूंदराव फाटक, उद्योगपती प्रकाश गायकवाड, प्रकाश राणे,सदाशिव ओगले, महिला तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूस्कर, सौ.प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा शहर अध्यक्ष योगेश पाटकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील, भाजपा न.पं.गटनेते शरद ठुकरूल, ओमटेक असोशिएटचे सुशिल लोके, समीर पेडणेकर, हेमंत देसाई तसेच भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.पडेलकॅन्टिन, तळेबाजार, शिरगाव येथेही ना.नितेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

 

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ना.नितेश राणे यांच्या पहिल्याच दौèयात जोरदार स्वागत करण्यात आले.देवगड भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित स्वागत समारंभामध्ये प्रथम देवगड तालुका भाजपाच्यावतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर भाजपा नगरसेवक, सरपंच, देवगड अर्बन बँक, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग, कुणकेश्वर देवस्थान टड्ढस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत, देवगड तालुका आंबा उत्पादक संघ, ओमटेक असोशिएट, राष्टड्ढवादी काँग्रेस, सन्मित्र मंडळ, देवगड मेरीटाईम बोर्ड, देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था, देवगड फिशरमेन्स सोसायटी, तारामुंबरी मच्छिमारी संस्था आदी विविध संस्था यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

 

यावेळी ना.नितेश राणे म्हणाले, देवगडचा मंत्री होत नाही हा देवगड तालुक्यावर बसलेला ठपका मला मंत्रीपद मिळाल्याने पुसून काढला आहे.देवगडवासियांने निस्वार्थीपणे प्रेम केले.माझामध्ये आणि देवगडवासियांमध्ये काहींनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र ते घरी बसले नी मी मंत्री झालो.त्यावेळी विरोधी आमदार असूनही देवगडवासियांनी मला साथ दिली आता मंत्री झाल्याने पाच वर्षे स्वस्थ राहा.देवगडवासियांच्या अपेक्षा व इच्छा, विकासकामे पुर्ण करून देण्यासाठी मी कटिबध्द आहे अशी ग्वाही यावेळी दिली.देवगड हे माझे मॅगनेट आहे. यामुळे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण देवगडचा विकासासाठी देणार असून मला बंदर व मत्स्योद्योग मंत्रीपदाची दिलेली जबाबदारी ही देवगड तालुक्यातील बंदरांचे सोडविण्यासाठी पार पाडेन.माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे, यांना अपेक्षित असलेला देवगड विकसित करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.