गतवर्षी २०२३ ला तब्बल२० वर्षानंतर एकत्रित येऊन स्नेह संमेलनाची प्रथमच सुरुवात करण्यात आली.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता.त्याच जोश मध्ये व उत्साही वातावरणामध्ये याही वर्षी दि. *१डिसेंबर२०२४* रोजी *पाटील फार्म हाऊस विरार* येथे स्नेहसंमेलन संपन्न झालं.
स्नेह – संमेलनात वर्गातील स्वर्गीय मित्रांना आठवण म्हणून आदरांजली वाहून दिवसाची सुरुवात करण्यात आली. मुंबई स्थित व गावावरून आलेले आपले मित्र यांनी आपली मैत्री आणि अतूट नाते कसे असावे आणि ते कसे जपावे यावर प्रत्येक मित्र-मैत्रिणींनी आपल्या भावना व जुन्या आठवणीना उजाळा दिला.
विविध शैक्षणिक ,सांस्कृतिक , मनोरंजक कार्यक्रम घेऊन प्रत्येक मित्र /मैत्रिणींना भेटवस्तू स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.हे नुसते स्नेहसंमेलन नसून एक महोत्सव आहे या खुशीमध्ये प्रत्येक जण आनंदित न्हावून गेला होता.
प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या सुख दुःखात ,अडचणीमध्ये सामील होऊन प्रत्येक आपला मित्र/ मैत्रीण मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी सर्व मित्रांनी संकल्प हाती घेतला.










