अहाहा… सुंदर….कोकण कोस्टल मॅरेथॉन म्हणजे दर्जा…

 

 

टी शर्ट अनावरण प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कौतुकोदगार 

मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रथमच रत्नागिरी मधे आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी वेळात वेळ काढून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन च्या दुसऱ्या पर्वा च्या टी शर्ट चे अनावरण केले.

 

कोकणची जैवविधता दर्शविलेल्या टीशर्ट चे अनावरण करताना उत्स्फूर्तपणे “अहाहा सुंदर… कोकण कोस्टल मॅरेथॉन म्हणजे दर्जा,….” असे उदगार त्यांच्या तोंडून बाहेर पडले.

 

सुवर्णसुर्य फाऊंडेशन च्या माध्यमातून कोकणवासीय आयोजित करत असलेल्या या मॅरेथॉन साठी कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधिताना दिले.तसेच जास्तीत जास्त कोकणवासियांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी केले

 

टीशर्ट अनावरणप्रसंगी सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्यासह श्री राहुल पंडित,श्री बाबू म्हाप तसेच टीम कोकण कोस्टल चे श्री सुहास ठाकूरदेसाई , महेश सावंत, योगेश मोरे,निलेश शाह, कांचन चांदोरकर, प्रसाद देवस्थळी, सारंग ओक उपस्थित होते.

 

ऍथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यतेने होत असलेल्या या मॅरेथॉन साठी जवळपास ७० हून अधिक शहरांमधून फिटनेस प्रेमी येत आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणेच रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त हॉटेल फिटनेस टुरिस्ट कडून बुक झाली आहेत आणि त्यामुळे हॉटेल तसेच रेस्टोरेंट चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन या उपक्रमांचे हॉस्पिटेलिटी पार्टनर आहेत.

 

कोकणातील जैवविविधता मॅरेथॉन च्या माध्यमातून जागतिक पटलावर पोचविण्यासाठी कोकणवासीय करत असलेल्या या प्रयत्नांची दखल पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी देखील घेतली आहे आणि या उपक्रमाचे पर्यटन संचालनालय प्रेझेंटेड बाय पार्टनर आहेत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तसेच नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले , कोळंबे ,फणसोप, भाट्ये गावांमधील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ रुट सपोर्ट करणार आहेत…

 

मेनेकी ऍबसॉल्यूट या उपक्रमाचे एनर्जी पार्टनर असून, बँक ऑफ इंडिया असोसिएट पार्टनर आहेत ,अनबॉक्स या उपक्रमाचे H२O पार्टनर आहेत, जोशी फूड्स कडून सर्व सहभागी फिनिशर्स ना उकडीचे मोदक दिले जाणार आहेत तर सुरस स्नॅक्स सेंटर हे बीब कलेक्शन दरम्यान फूड पार्टनर चे काम करणार आहेत. मागील वर्षीप्रमाणे फिटनेस मंत्रा च्या अंकिता पाटकर आणि त्यांची संपूर्ण टीम झुंबा सेशन घेणार असून, पितांबरी क्युअर ऑन ऑइल च्या माध्यमातून जगप्रसिद्ध असे पितांबरी प्रोडक्ट्स क्युअर ऑन पार्टनर च काम करणार आहेत. आर्यक सोल्युशन्स या उपक्रमाचे टेक्नोलोंजि पार्टनर आहेत. ओम पाडाळकर फोटोग्राफी च्या माध्यमातून फोटोग्राफी , व्हिडीओग्राफी होणार आहे तर नगर परिषद रत्नागिरी या उपक्रमाचे स्वच्छता पार्टनर आहेत

 

रत्नागिरी शहरात हॉटेल फ्लेवर्स के सी जैन नगर , आनंदकल्प हॉस्पिटल शांती नगर, जोशी फूड्स फॅक्टरी आउटलेट मारुती मंदिर, उत्कष स्टेशनरी आरोग्य मंदिर आणि हॉटेल कार्निवल इथे रजिस्ट्रेशन साठी ऑफलाईन फॉर्म सुद्धा उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त जणांनी कोणवासियांच्या जगासाठी आयोजित केलेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले आहे.