तुळस जि. प. मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ 

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांची उपस्थिती

वेंगुर्ले l प्रतिनिधी :राष्ट्रसेवा आणि जनकल्याणा साठी समर्पित देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टी’चे सदस्य नोंदणी अभियान तुळस जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांच्या उपस्थितीत तुळस येथील उत्सव हॉल येथे संपन्न झाले.

यावेळी भाजपा सरचिटणीस तथा अभियान सहसंयोजक श्री. पप्पू परब, शक्तींकेंद्रप्रमुख श्री. बाबूशा परब, श्री.कमलेश गावडे, श्री.संतोष शेटकर, माझी सरपंच श्री.शंकर घारे, भाजपा तुळस गावप्रमुख श्री.रामू परब, युवामोर्चा सरचिटणीस तथा अभियान सोशल मीडिया प्रतिनिधी वैभव होडावडेकर, मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, होडावडा उपसरपंच श्री.राजबा सावंत, तुळस उपसरपंच श्री.सचिन नाईक तसेच सर्व मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्य, बुथप्रमुख, बुथवरील कार्यकर्ते, सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.