पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले तालुक्यात रुग्णांना फळ वाटप, शाळकरी मुलांना खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

वेंगुर्ले : प्रतिनिधी
मत्स्य व बंदविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस भाजप तर्फे वेंगुर्ले तालुक्यात रुग्णांना फळ वाटप, शाळकरी मुलांना खाऊ वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, तर शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष श्री विष्णू उर्फ पपू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा निमंत्रीत सदस्य श्री साईप्रसाद नाईक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ सुजाता पडवळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत गावडे, तालुका अध्यक्ष श्री प्रणव वायंगणकर, अल्पसंख्यांक सेल चे सायमन आल्मेडा, हसीना बेगम मकानदार, जिल्हा का. का सदस्य श्री प्रितेश राऊळ, श्री नीलेश सामंत, ओबीसी मोर्चाचे श्री शरद मेस्त्री, श्री रमेश नार्वेकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर , शहराध्यक्ष सौ श्रेया मयेकर, शहर चिटणीस सौ रसिका मठकर, सौ आकांक्षा परब, सौ मानसी परब, मच्छीमार सेल चे श्री अनंत केळुस्कर, बूथ अध्यक्ष श्री पुंडलिक हळदणकर,श्री कृष्णा हळदणकर, श्री भूषण सारंग, किसान मोर्चाचे श्री यशवंत पंडित, आसोली सरपंच श्री बाळा जाधव, श्री सोमा मेस्त्री, बूथ अध्यक्ष श्री शेखर काणेकर , श्री राजन केरकर, श्री गुरूनाथ घाडी, श्री दाजी परब, माजी बूथ अध्यक्ष श्री अजित कनयाळकर , बूथ अध्यक्ष श्री सीताराम साळगावकर , श्री संतोष सावंत, श्री मारुती दोडशानट्टी ,श्री महेश प्रभुखानोलकर, श्री गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.