गवा रेड्यानी काजू बागेची नासधूस केलेल्या चाफेड भोगलेवाडी येथील सुनीता कांडर यांना वनविभागाकडून आर्थिक मदत 

 

सरपंच किरण मेस्त्री यांचा पाठपुराव्याला यश

शिरगाव ( प्रतिनिधी)    देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील शेतकरी श्रीमती सुनिता कांडर यांच्या काजू बागेतील जुलै महिन्यात गवा रेड्यांनी काजूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. या बाबत सरपंच किरण मेस्त्री यांनी वनअधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला होता.

याबाबत वनविभागाकडून सदर शेतकरी महिलेला सुमारे १०००० रूपये आर्थिक मदत मिळाली आहे.

यापूर्वीही उन्हाळी शेतीचे गवा रेड्यानी मोठ्या प्रमाणत नुकसान केले होते. यावेळीही सरपंच किरण मेस्त्री यांनी पाठपुरावा करुन त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ ते ५ हजारांची नुकसान भरपाई मिळवून दिली होती.

नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल त्यानी वन अधिकारी व सरपंच किरण मेस्त्री यांचे आभार मानले आहेत.