तळे-देऊळवाडीमध्ये २८, २९ रोजी क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवली येथील जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने २८ व २९ डिसेंबर रोजी अष्टक्रोशी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तळे- देऊळवाडी मराठी शाळेजवळ स्पर्धा होणार आहेत. किंजळे तर्फे नातू, शिंगरी, मांडवे, रसाळगड, मौजे जैतापूर, तळे अंतर्गत विभागातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यास २५ हजार रूपये, उपविजेत्यास १५ हजार रुपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांनाही गौरवण्यात येणार आहे.