पाली ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया,रक्तदान,दिव्यांग शिबिर

प्रतिनिधी | पाली : ग्रामीण रुग्णालय पाली येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय पाली येथे शस्त्रक्रिया शिबिर,रक्तदान शिबिर, दिव्यांग शिबिर व तत्काळ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप व अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.विकास कुमरे यांनी केले.या शिबिरात रत्नागिरी तालुक्यातील व दशक्रोशितील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा.रविंद्र सामंत हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी भूषविले,त्याच बरोबरच या कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.विकास कुमरे,पाली गावचे सरपंच विठ्ठल सावंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बँकेचे संचालक रामचंद्र गराटे,प्रकाश परपते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश शिरसाट,वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे, डॉ.मनिष वर्मा, दंत शल्य चिकित्सक डॉ.शुभदा बडवे ,डॉ.नेहा बोले, आर.बी.ऐस.के चे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग,ऐनजीओच्या पाथरे मॅडम,शिबिरासाठी आलेले सर्व तज्ञ अधिकारी व कर्मचारी वर्ग,पाली पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक,रुग्ण त्यांचे नातेवाईक,ग्रामीण रुग्णालय पालीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.