माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे गुरुवारी रत्नागिरीत

 

गोदुताई जांभेकर शतक महोत्सवी सोहळ्यासह प्रशासकीय बैठकीला राहणार उपस्थित

रत्नागिरी:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे उद्या गुरुवार दि. ०२ जानेवारी, २०२५ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून प्रशासकीय बैठकांसह गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुंबईहून सकाळी रत्नागिरी विमानतळ येथे आल्यानंतर खा. राणे हे सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये जिल्हा विकास यंत्रणा ‘दिशा’ आणि संसदीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

तर दुपारी ०४.०० वाजता रत्नागिरी एज्युकेशन सोसायचं गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी च्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.