गुहागर | प्रतिनिधी : क्रिसमसची सुट्टी लागल्याने शिक्षक असलेले जालिंदर जाधव हे आपल्या गावी गेले होते त्यामुळे त्यांचं घर बंद होतं या बंद घराचा फायदा घेऊन चोरट्याने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शृंगारतळी आबलोली या मुख्य मार्गावर असलेल्या गणेश नगर येथील बंगल्याच्या मागचे दार फोडून घरातील कपाटा मधील सोने व रोख रक्कम अशी एकूण दीड लाखाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही घटना घडली असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला या चोरीच्या घटनेने शृंगारतळी वासियांची झोप उडवली आहे.
दिनांक १/१/२०२५ रोजी सकाळी जालिंदर जाधव हे गावावरून शृंगारतळी येथल गणेश नगर मधील आपल्या घरी आले जेव्हा त्यांनी घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे त्यांनी सर्व वस्तूंची पाहणी केली तेव्हा कपाटातील सोने-चांदी आणि रोख रक्कम ही चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने घराचा मागील दरवाजाच्या कडी कोयडा तोडुन घरात प्रवेश केले तेही त्यांच्या लक्षात आले. शृंगारतळी गणेश नगर येथील जालिंदर जाधव यांनी याबाबतची फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आहे ते दिनांक २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर यादरम्याने क्रिसमस ची सुट्टी असल्याने ते आपल्या गावी गेले असता शृंगार तळी गणेश नगर येथील त्यांच्या घराचे मागचे दार फोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाटा मधील सोने व अन्य वस्तू असे एकूण दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरला आहे याबाबतची नोंद गुहागर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले असून अज्ञात चोरट्याविरोधात गुहागर पोलिसांनी भा. द. वि .कलम ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप भोपळे करत आहेत.











