वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन
आबलोली (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर तर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व नवसंकल्पना वृध्दींगत करणे या उद्देशाने रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रकल्प २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने व्हेईकल सेफ्टी सिस्टीमचा
” सेफ्टी गॉगल ” हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक संपादन केला आहे. पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाला रोख रक्कम सात हजार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरतर्फे यंदाच्या दुसऱ्या वर्षी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रकल्प २०२४ ही स्पर्धा वेळणेश्वर येथे नुकतीच संपन्न झाली. सदरच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे महाविद्यालयाने सहभाग नोंदवून व्हेईकल सेफ्टी सिस्टीमचा ” सेफ्टी गॉगल ” हा प्रकल्प सादर केला होता. आरुष हेरवाडे , शुभम पडवळकर , दुर्वांक किर व अथर्व विचारे या विद्यार्थ्यांनी व्हेईकल सेफ्टी सिस्टीमचा सेफ्टी गॉगल सादर करून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला. पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाला रोख रक्कम सात हजार व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. प्रा.मयेकर , प्रा.बेलवलकर , प्रा.श्रीम.साळवी आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. गौरव समारंभासाठी वेळणेश्वर अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी , उपप्राचार्य अविनाश पवार , संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रा.केतन कुंडिया , स्पर्धा समन्वयक डॉ.गणेश दिवे , प्रा.सतिश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सादर केलेल्या ” सेफ्टी गॉगल ” या प्रकल्पाने प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , प्राध्यापक – शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












