मिशन बंधारे ;पांगारी तर्फे वेळंब येथे श्रमदानातून बांधले 2 विजय बंधारे
गुहागर ( प्रतिनिधी): पंचायत समिती गुहागर, ग्रामपंचायत पांगरी तर्फे वेळ॔ब व ग्रामपंचायत अधिकारी संघटना, गुहागर च्या वतीने पांगरी तर्फे वेळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नदीवर दोन विजय बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविण्यात आले आहे.
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाच्या माध्यमातून श्रमदानातून ग्रामस्थांनी तसेच अधिकारी कर्मचा-यांनी एकत्र येवून हे सुमारे 20 मीटर लांबीचे दोन विजय बंधारे बांधले. या बंधा-यामुळे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या विहीरींना तसेच नदीशेजारील नारळ -सुपारी बागेला तसेच गुरेढोरे,कपडे धुण्यासाठी शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे.
गेली16-17वर्षे पांगरी वेळंब गावक-यांनी ही श्रमदानातून बंधारा बांधण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी अधिकारी सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रतिक जाधव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड,माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर , ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबुराव सूर्यवंशी, पांगारी त.वेळंबचे ग्रामपंचायत अधिकारी श्री.घेवडे, श्री.जाधव,श्री.क्षिरसागर, विविध ग्रामपंचायत पंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, वाडी अध्यक्ष शिवाजी खांबे,माजी सरपंच विष्णू वीर,माजी गामपंचायत सदसया विद्या खांबे,अरविंद खांबे,पांडुरंग खांबे, सखाराम तांबे,यशवंत गिजे,कृष्णा गिजे,ग्रामपंचायत कर्मचारी संदिप जाधव ,अंगणवाडी सेविका सोनाली खांबे,मनाली गिजे, पूर्वा शितप,प्रतिक्षा खांबे,पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे,संजना खांबे,सखाराम खांबे,गंगाराम खांबे अनंत तांबे,शालिनी तांबे शिवराम तांबे, जयश्री खांबे, सायली खांबे, गंगा खांबे, नर्मदा खांबे, गणपत खांबे , भरत खांबे, गोपाळ खांबे, रजनी खांबे, वनिता खांबे, सुषमा खांबे, सुनंदा खांबे, वासंती खांबे,वंदना खांबे, सुलोचना खांबे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











