मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर
संग्राम कासले, केशव (भाऊ) भोगले, झुंजार पेडणेकर यांना पत्रकार पुरस्कार
जेष्ठ पत्रकार सुरेश ठाकुर, नितीन आचरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार
100 इडियट ग्रुप मालवण रत्न तर साई पारकर यांचा कलारत्न पुरस्कारांनी होणार सन्मान
आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार पुरस्कारांचे वितरण
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार समितीच्या बैठकीत एकमताने निश्चित करणत आले. अध्यक्ष संतोष गावडे यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार समिती व पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर
यांना जाहीर करण्यात आला आहे. यांसह जेष्ठ पत्रकार सुरेश ठाकुर व नितीन आचरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान मालवण पत्रकार समितीच्या वतीने गतवर्षी पासून मालवणरत्न व कलारत्न हे दोन नवीन विशेष पुरस्कार सामाजिक, कला क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तीना देण्याचा निर्णय झाला. यावर्षी मालवणरत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या 100 इडीयट यां ग्रुपला देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर कलारत्न या पुरस्काराने साई पारकर यांचा सन्मान होणार आहे.
आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थित या पुरस्कारांचा वितरण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
मालवण तालुका पत्रकार समिती बैठकीत पुरस्कार निवड निश्चित झाली. यावेळी अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगंध बादेकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, तालुका उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव संदीप बोडवे, महेश सरनाईक, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, मनोज चव्हाण, विशाल वाईरकर, भाऊ भोगले, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर, उदय बापार्डेकर, समीर म्हाडगुत, गणेश गांवकर, आप्पा मालंडकर, उदय बापार्डेकर, भूषण मेतर आदी उपस्थित होते.
मालवण पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत घेण्यात आलेल्या इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत विजेते ठरलेल्या प्रफुल्ल देसाई, भाऊ भोगले, दत्तप्रसाद पेडणेकर यांचा पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सौंगंधबादेकर यांनी दिली.
फोटो : झुंजार पेडणेकर
फोटो : संग्राम कासले
फोटो : केशव (भाऊ) भोगले
फोटो : साई पारकर












