मडुरेत विहिरीत बिबट्या कोसळला

बांदा  l प्रवीण परब :मडूरा – मोरकेवाडी येथील सार्वजनिक विहिरीत मृतावस्थेत बिबट्या निदर्शनास आला. भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. सदर बिबट्या दोन दिवसांपूर्वी विहिरीत कोसळला असावा अशी शक्यता आहे. जीव वाचविण्यासाठी धडपड करताना बिबट्याने पाण्याच्या पंपाचे विहिरीतील पाईप फोडले. याबाबतची माहिती सावंतवाडी वनविभागाला देण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.