BREAKING NEWS : आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार

शंकर वैद्य | साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – कोल्हापूर मार्गांवरील आंबा घाटात साखरेचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी (वय ३६ रा.र भोटारावा पोष्ट कर्मा ता. कोंडरमा राज्य झारखंड) हा आपल्या ताब्यातील ट्रक (एम एच १० डी टी ४४०९) फलटण येथून साखरेची पोती भरून जयगड येथे जात असताना आज शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता आंबा घाटातील महामार्गाचे काम सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी बंद रोडच्या कडेला असलेल्या दरीत कोसळून अपघात झाला. यात चालक महमंद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी जागीच ठार झाला.

अपघाताचे वृत्त समजताच डी वाय एस पी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे,साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला, वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.