माखजन l वार्ताहर : कोकण कोस्टल मॅरेथॉन २०२५ मध्ये
महिला गटात ३५ ते ४५ वर्षे वयोगटात लांजाची सौ सविता सुयोग तांबे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. योगेश मोरे यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.
कोकण कोस्टल मॅरेथॉन २०२५ ही स्पर्धा रत्नागिरी येथे झाली. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटर धावणे अशा पद्धतीची स्पर्धा होती. यातील पाच किलोमीटर धावणे यामध्ये वयोगट ३५ ते ४५ वर्षे महिला गटातून सौ. सविता जगदाळे-तांबे यांनी ही स्पर्धा ३५ मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक पटकावला.
सविता जगदाळे-तांबे या सेंट अँन विद्यानिकेतन देवधे या शाळेवरती स्पोर्ट टीचर तसेच वक्रतुंड फिटनेस क्लबच्या संचालिका आहेत.त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











