भाजपाच्या सदस्य नोंदणीचा आढावा खा. नारायण राणे घेणार

कुडाळ प्रतिनिधी

भाजपाच्या सदस्य नोंदणीचा आढावा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात खा.नारायण राणे बुधवार ८ जानेवारी रोजी घेणार असल्याची माहिती अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई यांनी दिली.

भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान १५ पर्यंत सुरू राहणार आहे बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रभारी महेश जाधव उपस्थित राहणार आहेत बुधवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सावंतवाडी येथे दुपारी २.३० वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी तर कणकवली येथे सायंकाळी ५.३० वाजता प्रहार भवनला बैठक होणार आहे.

या बैठकांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर झालेल्या नोंदणीचा आढावा घेण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने दिलेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे एक लाख सभासदांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

१५ जानेवारी पर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असून या बैठकीला सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच ,उपसरपंच सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चा व प्रकोष्ठांचे पदाधिकारी तसेच पक्षाचे तालुका व जिल्हा कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यांनी सदस्य नोंदणी अहवाला सह उपस्थित राहावे असे आवाहन देसाई यांनी केले आहे. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, पप्या तवटे , रुपेश कानडे, संदेश नाईक, सुनील बांदेकर उपस्थित होते