जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केले उपजिल्हाप्रमुख पद
कुडाळ प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांना शिवसेनेने पुन्हा एकदा उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती दिली आहे त्यांच्या वाढदिवसा दिनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी हे पद जाहीर केले.
आनंद शिरवलकर यांचा वाढदिवस कुडाळ येथे साजरा करण्यात आला यावेळी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या वाढदिवसादिनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आनंद शिरवलकर यांना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती दिल्याचे जाहीर केले.
यावेळी उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करालकर, सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, राकेश कांदे, आबा धडाम, रेवती राणे, राजा गावडे आदी उपस्थित होते.













