53 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या अज्ञातावर गुन्हा
रत्नागिरी । प्रतिनिधी :तालुक्यातील गोळप फाटा येथील टॉवरच्या 24 बॅटर्या,20 लिटर डिझेल आणि क्रँकर असा एकूण 53 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. चोरीची ही घटना सोमवार 6 जानेवारी रोजी सकाळी 10 ते मंगळवार 7 जानेवारी रोजी पहाटे 5 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत सुहास दत्ताराम चव्हाण (44,रा.गवाणे गवळीवाडी लांजा,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पालिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी सुहास चव्हाण हे या टॉवरच्या बॅटर्यांच्या देखभालीचे काम करतात. हा इंडस कंनीचा टॉवर असून त्यावर एअरटेल,जिओ,वोडाफोन कंपनीचे नेवटर्क आहे. टॉवरच्या तळाला पत्र्याची बंदिस्त केबीन असून त्यामध्ये टॉवरला पॉवर देण्यासाठी 2.2 व्होल्टेजच्या बॅटर्या ठवलेल्या होत्या. अज्ञाताने या पत्र्याच्या केबीनच्या दरवाजाचे कुलुप तोडून त्यातील 48 हजार रुपयांच्या 24 बॅटर्या 2 हजार रुपयांचे 20 लिटर डिझेल असलेला कॅन आणि 3 हजार रुपयांचा पॉवर कॅ्रंकर चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 334 (1),305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











