खेड(प्रतिनिधी) जेसीज चे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. जेसीज या संघटनेचा नावलौकिक देशभरात आहेच. परंतु दरवर्षी होणारे जेसीज फेस्टिव्हल हे जगभरात प्रसिद्ध आहे. असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
त्यांच्या हस्ते जेसीज फेस्टिव्हल चे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई येथील व्यवसायिंकाना गेली २२ वर्ष व्यावसायिक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी जेसीज ही कोकणातील एकमेव संस्था असल्याचा उल्लेख देखील केला. यावेळी जेसीज चे अध्यक्ष अमर दळवी यांच्या हस्ते ना. कदम यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उद्योजक विलासभाई बुटाला, शिवाजी जगताप – उपविभागीय अधिकारी, सुधीर सोनवणे तहसीलदार – खेड ,रणजित राजेशिर्के खेड बस स्थानक प्रमुख, जेसीज अध्यक्ष अमर दळवी , फेस्टिवल कार्यक्रम प्रमुख प्रमोद कांबळे, अमोल गुहागरकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
या फेस्टिवल च्या निमित्ताने रोज सायंकाळी मराठी व हिंदी सिने सृष्टीतील कलाकार हजेरी लावणार आहेत.
तर रशियन परदेशी कलाकार १२ जानेवारी रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत परदेशी कलांचे सादरीकरण करणार आहेत.
फेस्टिवल नियोजनबध्द पार पडण्यासाठी शैलेश मेहता, आनंद कोळेकर, जावेद कौचाली, प्रफुल शेवरकर, राजन दांडेकर, अनंतराय प्रभू, जलाल राजपूरकर, अमित कदम, गणेश राऊत, दीपक नलावडे, पराग पाटणे, संकेत अपिष्टे, मधुर पेठे , प्रथमेश खामकर, अमित गरुड, हनीफ घनसार, शशिकांत मेहता आदी विशेष मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित नामुष्टे, प्रथमेश खामकर व आभार प्रदर्शन जेसी कपिल कोळेकर यांनी केले.










