कुळांच्या वारस तपासाचा प्रश्न अखेर निकाली

वारस तपासाची ऑनलाइन सुविधा आता तलाठी यांच्याकडे उपलब्ध

खेड | प्रतिनिधी : कुळांच्या वारस तपासाचा प्रश्न निकाली लागला आहे. कुळाचा वारस तपास करण्याची ऑनलाइन सुविधा आता तलाठी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील व जिल्ह्यातील कुळांचा वारस तपास करणे सुलभ होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे कोकणात विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात-बाराच्या इतर अधिकारात कुळाच्या नोंदी आहेत. कुळाचे नाव मालक म्हणून कब्जेदार सदरी येण्यापूर्वी तो मयत झाल्यास त्या कुळाचा वारस तपास करण्याची ऑनलाइन सुविधा तलाठी यांना उपलब्ध नव्हती. याबाबत काही तक्रारीसुद्धा येत होत्या. ही सुविधा नसल्याने तलाठ्यांनाही कार्यवाही करता येत नव्हती. मात्र, बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला कुळाच्या वारस तपासाची ही सुविधा जमाबंदी आयुक्त कार्यालयाने आता ‘तलाठी लॉग
इन’ला उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे कुळांच्या वारस तपासाचा प्रश्न सुटला आहे

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी असे कुळाचे वारस तपास करायचे असल्यास संबंधित तलाठ्यांकडे वारस नोंद करण्याबाबत अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत व कुळाचा वारस तपास करवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे कुळाचा तपास जलदगतीने तपास करणे शक्य होणार आहे.