रोणापाल गावच्या सुकन्या
बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई तर्फे रोणापाल (ताल सावंतवाडी) गावाच्या कन्या पूर्णिमा गावडे – मोरजकर यांच्या ‘गजाल गाथण’ व प्रकाश सरवणकर लिखित ‘गजालीतली माणसे’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध मालवणी लेखक प्रभाकर भोगले, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे उपस्थित राहणार आहेत. पूर्णिमा मोरजकर या मडुरा इंग्लिश स्कूल प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी असून त्या रोणापाल (ता. सावंतवाडी) गावच्या सुकन्या आहेत. त्यांनी आतापर्यंत मालवणी भाषेत बरेच लेख व कविता लिहिल्या आहेत. पुस्तक प्रकाशन समारंभाला मुंबईस्थित जास्तीत जास्त वाचकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई यांनी केले आहे.












